माझी आई निबंध (Marathi Nibandh )

आई हे साक्षात परमेश्वराचे रूप आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आई म्हणजे अशी व्यक्ती तिची तुलना वर्णन शब्दांमध्ये केली जाऊ शकत नाही. ती या संपूर्ण विश्वातील सर्वात चांगली व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पहिला गुरु मार्गदर्शक ही आई असते. माझी आई ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. ती माझ्या जीवनाच्या आधार आहे.

तिच्याशिवाय मला अजिबात करमत नाही. ती माझ्यावर खूप खूप प्रेम करते. ती मला प्रेमाने सोनू म्हणून हाक मारते. आईने मारलेली हाक मला पुन्हा पुन्हा एकाविषयी वाटते. माझी आई सकाळी लवकर उठते दररोज न चुकता देवपूजा करते. घरातील सर्व काम ती करते घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेते.

माझी आई खूप छान स्वयंपाक करते आईने कोणतेही पदार्थ बनवला तर तो उत्कृष्ट बनतो. घरातील प्रत्येक जण आईचे कौतुक करतो ती माझ्यासाठी नेहमी पौष्टिक आहार बनवते, तसेच शाळेत जेवण्यासाठी माझा डबा तयार करते. आईने बनवलेले जेवण मी खूप आवडीने खातो पण आईच्या हाताचे दोन घास खाल्ल्याशिवाय माझे पोट भरत नाही.

कारण तिने मायेने भरवलेल्या घासामुळेच माझे पोट भरते. माझी आई फारशी शिकलेली नाही पण ती जे शिकवते असे ज्ञान आपणास कुणीच देऊ शकत नाही. तिला नेहमी वाटते की माझ्या मुलाने पुढे खूप आणि खूप मोठा व्हावे देश सेवा करावी पुढे खूप शिकून आईची ही इच्छा व तिचे स्वप्न मी नक्की पूर्ण करणार

मित्रांनो माझी आई हा निबंध तुम्हाला कसा वाटला. आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर कमेंट मध्ये कमेंट करा. किंवा तुम्ही मला डायरेक्टली मेल सुद्धा करू शकता. मित्रांनो मी आशा करतो की तू तुम्हाला हा निबंध आवडला असेल धन्यवाद.

हे देखील वाचा

माझी आई निबंध

1 thought on “माझी आई निबंध (Marathi Nibandh )”

Leave a Comment